मुंबई | फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई आणि प्रिसिद्धी मिळवणाऱ्या टॉप सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. या यादीत सलमान खान, शाहरूख खान, अमिर खान या त्रिकुटाला मागे टाकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिलं स्थानं मिळवलं आहे.
विराट कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. कमाई आणि प्रिसिद्धीच्या आधारावर कोहलीला पहिलं स्थान मिळालं आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची या वर्षाची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. शाहरुखची वार्षिक कमाई 124.38 कोटी रुपये आहे. तर अभिनेता रणवीर सिंह सातव्या क्रमांकावर असून त्याची वार्षिक कमाई 118.2 कोटी रुपये आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे फोर्ब्सच्या या यादीत पहिल्या टॉप 10 मध्ये अभिनेत्री आलिया भटने स्थान मिळवले आहे. आलिया आठव्या स्थानावर असून तिची वार्षिक कमाई 59.21 कोटी आहे.
महत्वाच्या बातम्या-
हिंदू असणं पाप आहे का?; नितीन गडकरींचा सवाल https://t.co/EUMiJaqM9O @nitin_gadkari @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 22, 2019
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी विराटच्या वर्षभराच्या मेहनतीवर फेरलं पाणी! – https://t.co/3pwr70SEaB @imVkohli @BCCI #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 22, 2019
“CAA विरोधात असाल तर घराबाहेर तिरंगा फडकवा”- https://t.co/aOR52AMXC2 @asadowaisi
— थोडक्यात (@thodkyaat) December 22, 2019
Comments are closed.