पुणे महाराष्ट्र

आई-वडील शेतकरी, पोरगा बनला सीए…

पुणे | आई-वडील शेतकरी… शेतात कष्ट करुन मुलांना मोठं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यांच्या मुलानंही सी.ए बनून ते स्वप्न पूर्ण केलं. अनिल दादाभाऊ ढोकले असं या मुलाचं नाव आहे.

दादाभाऊ ढोकले हे पुण्याजवळच्या शिरुर तालुक्यातील करंदी गावचे शेतकरी, शेतीत काबाडकष्ट करताना त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीच हात आखडता घेतला नाही. त्यांचा मुलगा अनिलनं त्यांच्या या कष्टाचं सी.ए. बनून चीज केलं.

गावात दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर अनिलने ११वी-१२वीचं शिक्षण जवळच्याच जातेगाव इथून घेतलं आणि त्यानंतर शिक्षणासाठी पुणं गाठलं. आई-वडिलांच्या कष्टाची जाण असल्यानं सी.ए बनण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं.

दरम्यान, त्यानं पुण्यात राहून सी.ए.चा अभ्यास केला. अभ्यास करुन परीक्षा देताना अनेकदा नैराश्याचा सामना करावा लागला. मात्र हार न मानता अनिल लढत राहिला आणि आजचं यश त्याच्या पदरी पडलं. त्याच्या या यशानं करंदीमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसेच या गावातून मोठ्या प्रमाणावर सी.ए. होऊ लागल्यानं या गावाची ओळख आता सीएंचं गाव म्हणून होऊ लागली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल वाकडं बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही”

फडणवीसांच्या काळात वर्षा बंगल्यावर गुंडांचा वावर; बाळासाहेब थोरातांचा आरोप

इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही- आदित्य ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या