बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. लोकांच्या कलांचा, कोणाच्या स्टंटचा तर कधी कुठल्या प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने लोकांच्या अंगावर काटा आणला आहे.

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, असं म्हटलं जातं. हे वाक्य तितकंच खरं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका आईने आपल्यावर संकट घेऊन मुलाचा जीव वाचवला आहे.

व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या लहान मुलासोबत एका कट्यावर बसली आहे. यादरम्यान तिच्या मागे विटा रचलेल्या असतात. दोघे बसलेले असताना अचानक त्यांच्या मागील विटा पडतात त्यावेळी ती आई प्रसंगावधान दाखवत आपल्या मुलाला मागे लपवत सर्व विटा स्वत:वर पाडून घेते. यानंतर सगळ्या विटा तिच्या अंगावर पडतात.

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला ‘जगाला आईची गरज आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पुढे शेअर करण्यात आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चौकशांना मी घाबरत नाही”

”देशात तालिबानी राजवट लागू होऊ देणार नाही, मी जिंकले नाही तर…”

“भारतात बसून अंग मोडून आलं होतं, ती खास विमानंसुद्धा धूळखात पडून होती”

जिंकलेला सामना गमवायची पंजाबला सवय झाली आहे – अनिल कुंबळे

“सव्वा रुपया असो किंवा सव्वा कोटी मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More