‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ
मुंबई | छोट्या पडद्यावरील सध्या चर्चेत असलेला रिअॅलिटी शो म्हणजे ‘लाॅक अप’ (Lock Up). कंगना रणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असतो. त्यातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय ठरत असते. अशातच आता या शोमधील मुनव्वर फारूखी (Munavar Faruqui) सध्या चर्चेचा विषय ठरत असलेला पहायला मिळत आहे.
अलिकडेच मुनव्वर फारुखीनं एका भागात आपल्या खासगी आयुष्यातील एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. मुन्नवर म्हणाला, ‘ही घटना जानेवारी 2007 मध्ये घडली. माझ्या आजीनं मला सांगितलं होतं की माझ्या आईची तब्येत ठिक नाहीये. पोटादुखीमुळे मी माझ्या आईला ओरडताना पाहिलं होतं. मी माझ्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. मला सांगण्यात आलं की माझ्या आईनं अॅसिड पिलं होतं. तेव्हा मी तिचा हात पकडला होता. डॉक्टर मला म्हणाले की त्यांचा हात सोडून दे कारण त्यांचे निधन झाले आहे.
मुनव्वर पुढे म्हणाला की, 22 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात माझी आई कधीच आनंदी नव्हती. मी माझ्या आयुष्यात अनेकदा तिला मारहाण होताना पाहिली. माझे आई-वडील नेहमीच भांडत असलेले मी पाहिलेत.
दरम्यान, मुनव्वरच्या खासगी आयुष्यातील हा धक्कादायक खुलासा ऐकून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. या कार्यक्रमाची सूत्रधार कंगनालाही अश्रू अनावर झालेला पहायला मिळाले.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
‘राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा
राधे माँच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका
दिलासादायक ! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश भाऊजींनी फटकारलं, म्हणाले..
“चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरेंनी माझी चौकशी करावी, कारण…”
Comments are closed.