बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उच्चशिक्षित आईनं 6 महिन्यांच्या चिमुकलीसोबत केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!

हैद्राबाद | तेलंगणामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीएड शिकलेल्या एका महिलेनं देवाच्या मूर्तीसमोर आपल्या 6 महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला आहे. ही घटना तेलंगणातील सुर्यपेटा जिल्ह्यात घडली आहे. बी. भारती असं या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर घरातील तसेच गावातील सगळेच लोक हादरले आहेत.

8 वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न महबूबादच्या नावाच्या एका माणसाशी झालं होतं. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे लग्न मोडले. दोन वर्षांपासून ही महिला कृष्णा नावाच्या माणसासह संबंधात होती. त्यानंतर तिला एक मुलगी झाली. तिच्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत घरातील लोकांना आक्षेप होता.

घरच्यांच्या छळामुळे मानसिक ताणात आल्यानं या महिलेनं युट्यूबवर आधात्मिक व्हिडीओ पाहायला सुरूवात केली. गुरूवारी जेव्हा या महिलेचा पती कामासाठी सुर्यपेटा येथे गेला होता. त्यावेळी या महिलेनं देवाच्या मूर्तीसमोर आपल्या 6 महिन्यांची मुलगी रितूचा बळी दिला.

शोध सुरू केल्यानंतर या मुलीची मान कापलेल्या अवस्थेत मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र शिकलेली असताना या महिलेनं असं कृत्या का केलं हे अद्याप समोर आलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पोलिसांना मदत करा, त्यांना चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही द्या”

…तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल- अजित पवार

दीपक चहरच्या गोलंदाजीपुढे पंजाबचे खेळाडू ढेर; चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

“BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका”

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More