बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई तू इतकी क्रूर कशी झाली?, वारंवार दूध मागितल्याने बाळाला आपटलं; लेकराचा जागीच मृत्यू

रायपूर | आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना छत्तीसगडमधील कोरबा येथे घडली आहे. या घटनेनं सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवला आहे. एका आईने स्वतःच्याच लेकराचा जीव घेतला. यामागे असलेलं कारण देखील क्षुल्लक असून आईने असं पाऊल उचल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

कोरबा येथील बालकनगर परिसरात रहिवासी असणाऱ्या क्रूर आईचं नाव प्रमिला आहे. प्रमिलाला तीन वर्षाचा मुलगा होता. गुरुवारी सकाळी प्रमिला तिच्या मुलाला खायला घालत होती. तरी देखील तिचा मुलगा रडत असून वारंवार दूधाची मागणी करत होता.

मुलाचं नाव सात्विक राव असं होतं. सात्विक सतत दुध मागत असल्याने प्रमिलाने चिडून त्याला उचलून आपटलं. परिवाराने सात्विकला खाली पडलेलं पाहून रुग्णालयात नेलं. यावेळी डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. खाली आपटल्यामुळे सात्विकच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती.

दरम्यान, पोलीस प्रमिलाला अटक करणार असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. तपास करताना प्रमिलाचे मानसिक संतुलन नीट नसल्याचं समोर आलं आहे. प्रमिलावर उपचार सुरु होते. मात्र तिच्या रागाने तिच्या लेकराचा जीव घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण…’; सुधीर मुनगंटीवार ठाकरे सरकारवर बरसले

टी-20 विश्वचषकाचं अँथम रिलीज, विराट-पोलार्ड नवीन अवतारात, पाहा व्हिडीओ

“सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची भाषा बिघडली”

“शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचं फोडायचं?”

“भारताने जे केलं ते कोणीही करू शकलं नाही”; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More