बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे घालून दिला नवा आदर्श; आईची अस्थी शेतात पसरवली

वाशिम | वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा देत आईची अस्थी शेतजमिनीत पसरवली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील झोलेबाबा येथील ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या बंधूंनी नवा पायंडा पाडला आहे.

व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या अस्थी किंवा रक्षा पाण्यामध्ये सोडायच्या, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या बंधूंनी आईची अस्थी शेतजमिनीत पसरवली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डोंगरे भावंडांनी घालून दिलेल्या आदर्शावर इतरांनीही चाललं पाहिजे, किंबहुना ती काळाजी गरज असल्याची भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली. डोंगरे भावंडांनी उचलेल्या स्तुत्य पावलाचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जुन्या परंपरेला फाटा देत वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मणराव इंगळे यांच्या पार्थिवाला पाच मुलींनी खांदा दिला होतालक्ष्मणराव इंगळे यांच्या दोन्हीही मुलांचं निधन झाल्यामुळे लेकींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. लक्ष्मणराव इंगळे यांची दोन्ही मुले हयात नसल्यानं ते कर्तव्य चंदाताई क्षीरसागर, नंदिनी निलखन, नलिनी राऊत, विजया निमनेकर आणि बबिता घाटे या त्यांच्या पाच मुलींनी पार पाडलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

लोकांना लसीकरणात काय अडचणी येतात हे पाहण्यासाठी मंत्र्यांनी रांगेत उभं रहावं- नरेंद्र मोदी

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा काच शिल्लक ठेवणार नाही”

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या पत्रावर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More