बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चाकणच्या किल्यात राहणाऱ्या ताईंनी फक्त…’; रूपाली चाकणकरांना भाजपचा टोला

मुंबई | काही दिवसांपासून राज्यात महिलावर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढत होत चालली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला मोर्च्याच्या मुंबई अध्यक्ष शीतल देसाई यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार जेव्हा पासून सत्तेत आलं आहे. तेव्हापासून महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चाकणच्या किल्यात राहणाऱ्या ताईंनी फक्त बड्या व्यक्तींवर झालेल्या अन्यायालाच वाचा फोडू नये त्यासोबतच सामान्य महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचीही गंभीर दखल घ्यावी, यात पक्षपात करू नये असा टोला देसाई यांनी चाकणकरांना लगावला आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर अत्याचार करू नये. अत्याचारांचा निषेध करण्यात भेदभाव करणाऱ्या महिलांचे कृत्य लाजिरवाणे आहे. त्यामुळे महिलांच्या अत्याचारांविरोधात राज्यातील सगळ्या महिलांना एकत्र येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जावं, असं आवाहनही देसाई यांनी केलं आहे.

दरम्यान, 9 सप्टेंबरला मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान राजवाडी येथील रूग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वांना सुन्न केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक!’लसींचे दोन डोस घेतलेल्यांना…’; तज्ज्ञांनी केलाय महत्त्वाचा दावा

आघाडीत पुन्हा ठिणगी???; भर बैठकीत शिवसेनेचा ‘हा’ आमदार मदतनिधीवरून भिडला भुजबळांना!

“आंबेडकरी समाजावरील पोस्ट महागात, ‘या’ अभिनेत्रीला अटक होण्याची शक्यता”

‘असे गुन्हेगार का जिवंत राहतात, अशा नराधमांना…; साकीनाकामधील घटनेवर अमृता फडणवीस संतापल्या!

“फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते ‘शरद पवार’ तूर्तास वामकुक्षी घेतायत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More