तंत्रज्ञान

मोटोरोलाचा ‘मोटो G8 प्लस’ स्मार्टफोन लाँच; कमी किमतीत दिलेत हे ‘खास’ फिचर्स

मुंबई |  बाजारात सध्या एकावरचढ एक स्मार्ट फोन येत आहेत. नुकताच मोटोरोला कंपनीनं मोटोरोला वन मायक्रो हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीकडून G सिरीजमधला ‘मोटो G8 प्लस’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

‘मोटो G8 प्लस’ या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. हा फोन ऑक्टोबरच्या अखेरीसपर्यंत फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाइट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

फोनमध्ये 4 जीबी LPDDR4 रॅमसोबत 64 जीबीचं स्टोरेज देण्यात आलं आहे. तसंच 512 जीबी पर्यंत या फोनची मेमरी वाढवता येणार आहे. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच यात ट्रिपल रियक कॅमेरा सेटअपही देण्यात आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या