बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडवर पून्हा शोककळा! हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचं निधन

मुंबई | चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं काल निधन झालं. या धक्क्यामधून अजूनही लोक सावरू शकले नाहीत, त्यात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणा-या रामसे बंधुंपैकी कुमार रामसे यांचं निधन झालं.

कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असून 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कुमार रामसे यांचे निधन झालं. त्यांच्या जाण्यानं कलासृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कुमार रामसे यांच्या मागे पत्नी तसेच राज, गोपाल व सुनील अशी तीन मुलं आहेत. आपल्या सात भावांमध्ये कुमार सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये कुमार यांच्यासह केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता.

दरम्यान, कुमार रामसे हे पहिले निर्माते होते ज्यांनी आपला कल हाॅरर चित्रपटांकडे वळवला. रोमॅन्टिक चित्रपटाचा काळ असताना रामसे बंधुंनी हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. राना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर चित्रपटांची निर्मिती या ब्रदर्सने केली.

थोडक्यात बातम्या – 

मराठमोळी सई ताम्हणकर दिसणार ‘या’ हिंदी चित्रपटात, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

पदभार स्वीकारताच नारायण राणे अॅक्शन मोडमध्ये, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना झापलं

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेल्या हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

क्रिती सेनाॅनने ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटातील लुक केला शेअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More