बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडवर शोककळा! ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील अभिनेत्रीचं कोरोनामुळं निधन

मुंबई | देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. कोरोनामुळं अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. असं असताना आणखी एका अभिनेत्रीचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटामध्ये अभिनेता आयुषमान खुरानसोबत काम करणारी अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचं कोरोनामुळं निधन झालं आहे. रिंकूच्या चुलत बहिणीनं याबाबत माहिती दिली आहे.

25 मे रोजी रिंकूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती होम आयसोलेशनमध्ये होती. पण तिचा ताप उतरत नसल्यानं तिला रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी तिला सामान्य वार्डात भरती करण्यात आलं नंतर दुस-याच दिवशी आयसीयूमध्ये शिफ्ट केलं गेलं. रिंकू आधीच दम्याच्या आजारानं ग्रस्त होती. अशातच तिची प्रकृती बिघडली व तिनं अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, रिंकूनं चिडियाघर व बालवीर सारख्या मालिकेत काम केलं होतं. हॅलो चार्ली या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती. आयुष्यमान खुराणाच्या ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमात रिंकूनं महत्वाची भूमिका साकारली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ryinku Singh Nikumbh (@ryinkunikumbh)

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! पाच मुलांच्या आईने प्रियकराला सोबत घेऊन केली स्वत:च्याच पतीची हत्या

….म्हणून तरूणाने पोलिसांना फोन करत दिली थेट पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी

बाबो! पिंपळाला लागलाय आंबा?, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर समोर आलं खरं कारण

काँग्रेसने अण्णासाहेब पाटलांची हत्याच केली- विनायक मेटे

लाखो रुपये नव्हे फक्त 10 रुपयात ‘हे’ डॅाक्टर दाम्पत्य करतंय कोरोनावर उपचार!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More