बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडवर शोककळा! ‘इंदू की जवानी’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं कोरोनानं निधन

मुंबई | देशाच्या विविध भागात कोरोनानं हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर परिणाम होत आहे. अशातच बाॅलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत, तर अनेकांनी कोरोनामुळं आपले प्राण गमावले आहेत. बॉलिवूड चित्रपट निर्माते रायन स्टिफन यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांनी कियारा अडणवाणी मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘इंदू की जवानी’ची निर्मिती केली होती. काही दिवसांपूर्वी रायन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर गोव्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

रायन स्टीफन यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत.

 

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध, त्यामुळे आरक्षण गेले”

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं डाॅक्टरांना आवाहन म्हणाले….

धक्कादायक! सासरवाडीतून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला आणत बापाने पोरासोबत केलं हे धक्कादयाक कृत्य

परिवारचं प्रेम बघण्यासाठी रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, मात्र झालं असं की…

अरे बापरे! फुकटचं सॅनिटायझर म्हणून आजोबांनी सॅनिटायझरनंच केली मालिश, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More