सांगली | जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना राजारामबापू साखर कारखाना याठिकाणी राजारामबापू यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवर्तक शमसुद्दीन संदे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आमदारकी गेली उडत आधी शेतकऱ्याच्या घामाला दाम द्या, असं म्हणत यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकाही केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संदे म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात संघटनेच्या पुढाकारानं आपण जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची सभा आयोजित केली होती. या बैठकीत सर्वच कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचं मान्य केलं होतं. मात्र तीन कारखाने सोडता अद्याप एकाही कारखान्यानं एकरकमी एफआरपी जमा केलेली नाही.
ऊसाचे गाळप झाल्यापासून 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा करणं ऊस नियामक मंडळाच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी या नियमाचा भंग केला आहे. कोल्हापुर जिल्ह्यात मात्र जवळपास सर्वच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. असंही संदे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं.
म्हणूनच यापुढे गाळपाला जाणाऱ्या ऊसाला एकरकमी एफआरपी देण्यात यावा अशी मागणी घेऊन राजारामबापू यांच्या पुतळ्यास अभिषेक आणि होमहवन केला जाणार आहे. आम्ही आमदारकीसाठी आंदोलन करत नसून शेतकऱ्याला योग्य दाम मिळावा यासाठी आंदोलन करत असल्याचंही संदे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या नव्या घोषणेनं सांगलीत कारखानदारांना यापुढील काळात मात्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याने घेतली ‘कोरोना’ची लस अन् पाच दिवसातच…
‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव
रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…
Comments are closed.