बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या शिफारसी अमान्य करत मराठा आरक्षण कायदा रद्द केला आहे. त्यानंतर या निकालामुळे राज्य सरकारला मराठ्यांच्या असंतोषाला सामोरं जावं लागत आहे. मात्र मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने ‘नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना’ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर या उपसमितीच्या बैठकीत निर्णय देखील घेतला जाण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या शिफारसी अवैध ठरवला होता. त्यानंतर आता मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांचं मागासलेपण सिद्ध करणं आवश्यक आहे. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भ मिळणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. नव्यानं मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर अहवाल राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, याबाबत अद्याप सरकारच्या वतीनं कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मराठा समाजातील रोष शमवण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!

हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू

मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ

पुण्यात देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर’ उभारणार; पुणे महापालिका अलर्ट मोडवर

मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; डॉ. भालचंद्र काकडे यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More