ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?

Social Media Platform X | Tesla आणि Space X चे सीईओ एलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) युझर्सना आता चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट करता येणार आहे. मॉनिटायझेशनच्या माध्यमातून आता युझर्सना पैसा कमावता येईल.

एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क यांच्यामधील सोशल मीडियातील संवादातून ही माहिती समोर आली आहे. त्यात एलॉन मस्क यांनी एक्सवर चित्रपट, टीव्ही मालिका, पॉडकॉस्ट पोस्ट करता येईल, असं म्हटलंय. या संदर्भात एक पोस्ट देखील करण्यात आली आहे. यामुळे युझर्स आता मॉनिटायझेशनच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतात.

एलॉन मस्कची बहिण टोस्का मस्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, आता एक्सवर सुद्धा चित्रपट पाहता येईल, ही चांगली गोष्ट आहे. या पोस्टवर काही युझर्सने विना सब्सक्रिप्शन चित्रपट पाहण्यासाठी युझर्सला वन टाईम शुल्क ठेवण्याचे आवाहन केले आहे.

X वर आता चित्रपट, पॉडकास्ट पोस्ट पोस्ट करता येणार

एलॉन मस्क यांनी त्यांच्या फॉलोअर्ससाठी एआय ऑडियन्स हे फीचर घेऊन येणार असल्याचं (Social Media Platform X ) सांगितलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहचू शकता. एआय सिस्टम काही सेकंदात जाहिरातीसाठी मदत करेल. तुमच्या इच्छित ऑडियन्सपर्यत पोहचण्यासाठी मदत करेल.

लवकरच येणार ‘एआय ऑडियंस’ फीचर

एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये X (पूर्वीचे Twitter) विकत घेतले होते. तेव्हापासून मस्कने कंपनीचे नाव बदलून X असे केले आहे. यासोबतच कंटेंट पोस्ट केल्यावर मॉनिटायझेशन (Social Media Platform X ) सारखे अनेक फीचर्सना प्लेटफॉर्म वर जोडण्यात आलंय. आता लवकरच एआय ऑडियंस फीचर येणार आहे. यामुळे युझर्सना लाखो रुपये कमवण्याची संधी प्राप्त होईल.

News Title – Movies and podcasts can be posted on social media platform X

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस चांगला पडणार

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन