OTT वरील ‘हे’ 3 चित्रपट एकटे पाहण्याचं धाडस करू नका; खूप जास्त..

Movies on OTT | टीव्हीपेक्षा सध्याच्या काळात ओटीटीवरील चित्रपट, वेबसिरिज जास्त बघितले जातात. आता नवीन काहीही आलं की त्यासाठी सिनेमागृहात जायची गरज पडत नाही. तर, घरी बसूनच नवनवीन सिनेमे ओटीटीवर पाहता येतात. अनेक प्रकारचे चित्रपट हे ओटीटीवर पाहता येतात. काही चित्रपट तर तुमच्या मनावर खोलवर परिणाम करतात. त्याचा तुम्ही अधिक जास्त विचार करायला लागता. यामुळे बऱ्याचदा लोक विचलित (Movies on OTT) होऊन जातात.

काही धाडसी लोक असतात जे असे चित्रपट पाहू शकतात. तुम्हीही त्या धाडसी लोकांपैकी असाल तर ओटीटीवर हे तीन भयंकर सिनेमे उपलब्ध झाले आहेत. मात्र, तुमच्यात धाडस असेल तरच हे चित्रपट बघा. एकट्यात बघाल तर, तुम्ही विचलित होऊ शकता.

OTT वरील ‘हे’ 3 चित्रपट तुम्हाला विचलित करू शकतात

डॉगटूथ (Dogtooth) : हा चित्रपट एक ग्रीक चित्रपट आहे, ज्यामध्ये एका विखुरलेल्या कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यातील बाप आपल्या मुलांसाठी काय चांगलं, काय वाईट ते ठरवतो आणि त्यांना बाहेरच्या वाईट जगापासून वाचवण्यासाठी घरातच ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही मुले सत्यापासून आणि बाहेरच्या जगापासून लांब राहतात.पण, जसे ते मोठे होतात त्यांना घरातील हे वातावरण खटकतं व मग अशी कृत्ये करतात जे पाहून धक्का बसतो. या सिनेमात मन विचलित करणारी अनेक दृश्ये आहेत. तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही प्राइम व्हिडीओवर (Movies on OTT) बघू शकता.

द लास्ट हाउस ऑन द लेफ्ट (The Last House on The Left) : 1972 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, तेव्हा तो प्रचंड वादात अडकला होता. हा एक हॉरर चित्रपट आहे. ज्यात मेरी कॉलिंगवूड आणि तिची मैत्रीण फिलिस यांची गोष्ट सांगण्यात आली आहे. मेरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शहरात जाताना वाटेत त्यांचा एका गुन्हेगारांच्या टोळीशी सामना होतो आणि या दोघींचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार होतो. गुन्हेगार नंतर त्यांची हत्या करतात. या चित्रपटावर त्या काळात बंदी घालण्यात आली होती. 2009 मध्ये त्याचा रिमेक देखील आला होता. तुम्ही हा चित्रपट Plex वर बघू शकता.

इनफिनिटी पूल (Infinity Pool) : हा सिनेमा एका गुन्ह्यावर आहे. एक कादंबरीकार जेम्स फॉस्टर व त्याची पत्नी फिरायला जातात, तिथे त्यांना जेम्सची चाहती गॅबी व तिचा नवरा अल्बान भेटतात. गॅबी व अल्बानमुळे जेम्सच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ येतं. यामुळे जेम्स चुकून एक खून करतो. यासाठी जेम्सला जी शिक्षा मिळते (Movies on OTT) ती विचलित करणारी आहे.

News Title-  Movies on OTT 3 Horror Films

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

सावधान! ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी 

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चा नवा विक्रम, रुग्णांना 300 कोटीहून अधिक अर्थसहाय्य

दररोज फक्त 45 रुपयांची गुंतवणूक करा, 25 लाखांचा निधी मिळवा; जाणून घ्या योजना

‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा