बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमोल कोल्हे म्हणतात, “…मग त्यांना जातीवादाची कावीळ झालीये, असं म्हणावं लागेल”

पुणे | खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काही दिवसांपूर्वी पुणे एअरपोर्टवर लावण्यात आलेल्या पेशव्यांचे फोटोज शेअर करून नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या ट्विटनंतर अमोल कोल्हे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. या आरोपावर अमोल कोल्हे ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

अमोल कोल्हेंनी केलेल्या ट्विटनंतर त्यांच्यावर जातीयवाद भडकवण्याचे आरोप करण्यात आले होते. त्यावर कोल्हेंनी स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे, मागील आठवड्यात माझ पुणे एअरपोर्टवरील फोटोजने लक्ष वेधून घेतलं. पुणे जिल्ह्यातील किल्ले शिवनेरीवर स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती महाराजांचे कतृत्व दिसत नाही का?,हा यामागची भावना होती, असं ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले आहेत, या भागातील महत्त्वाच्या अशा सर्व प्रतिकांचं समान रिप्रेंझेंटेशन व्हावं ही भूमिका होती. त्याचबरोबर अनेक धार्मिक, सांस्कृतिक वास्तू व लोककला यांचेही रिप्रेझेंटेशन व्हावं हा निर्मळ हेतू यामागे होता. यात कोणताही जातीवाद येत नाही व ज्यांना दिसत असेल त्यांचा हेतू स्पष्ट नाही किंवा त्यांना जातीवादाची कावीळ झाली आहे, असं म्हणावं लागेल, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, अमोल कोल्हेंनी काही दिवसांपूर्वी पुणे एअरपोर्टवर लावण्यात आलेले पेशव्यांचे फोटो शेअर केले जाते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच. पंरतु पुण्यात केवळ शनिवारवाडाच नाही तर लाल महाल, सिंहगड, शिवनेरीसुद्धा आहे. याचा पुणे एअरपोर्ट ऑथिरीटीला विसर पडला काय? असे म्हटले होते.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या-

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका नाहीतर…”, किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More