बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

अहमदनगर | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे.  सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्यामुळे सरकारने काही समारंभ साजरे करतानाचे काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्व सार्वजनिक समारंभ मोजक्या आणि ठराविक लोकांमध्ये पार पाडावे लागत आहेत. परंतू, तरीही कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांचे लग्नाचे बार उडाले आहेत.

आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं सगळ्या गोष्टी थाटा-माटात होतात. प्रत्येकाला आपलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं असं व्हावं असं वाटत असतं. तसेच लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या दारात आपली वरात घेऊन जात असतो. परंतू अहमदनगर या जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी चक्क नवरदेव हेलिकॉप्टर घेऊन आला असल्याची माहिती समोर आली आहे.

नवरदेवासोबत अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी एन्ट्री घेतली. डॉ. अमोल कोल्हे यांनी झी मराठीवर असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारल्याने घराघरांत पोहोचले आहेत. त्यांना पाहण्यासाठी हेलिकॉप्टर जवळ त्यांच्या अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती.

दरम्यान, वडाळा बहिरोबा नेवासे तालुक्यातील येथील प्रगतिशील शेतकरी विलास मोटे यांची कन्या प्रणोती. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांचे चिरंजीव कार्तिक यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम शुक्रवार 2 जूलै रोजी कोरोना नियमांचे पालन करत मोजक्या लोकांमध्ये पार पडला. त्यावेळी काही 10-15 राजकीय नेतेही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते; त्यांच्याच हातात फुटला”

भास्कर जाधव पुन्हा तालिका अध्यक्ष; प्रतिविधानसभेवर तालिका अध्यक्षांची कारवाई

विधानमंडळ परिसरात भाजपची ‘प्रतिविधानसभा’; कालिदास कोळंबकर प्रतिविधानसभेचे अध्यक्ष

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा”

“ठाकरे सरकारचा हा बालिशपणा; लढायचं असेल तर मैदानात लढा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More