Top News देश पुणे महाराष्ट्र

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल

नवी दिल्ली | बैलगाडा संस्कृती ही महाराष्ट्राची शान मानली जाते, मात्र बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांमध्ये समावेश झाल्यापासून बैलगाडा शर्यतींवर बंदी आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जत्रा-यात्रांची शान हरवली असून ती पुन्हा परत येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे सुद्धा बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी हा दर्जा काढावा या मागणीसाठी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गिरीराज सिंह यांच्यासोबत बैलगाडा शर्यतीवर चर्चा केली तसेच आपल्या मागणीचं निवेदन त्यांना दिलं.

उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. प्राणीमित्र संघटनांच्या याचिकेनंतर यासंदर्भातील मुद्दा न्यायालयात गेला आहे. सध्या तो अंतिम सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या शर्यती पुन्हा सुरु झाल्यावर ग्रामीण भागात थंडावलेले आर्थिक चक्र देखील पुन्हा पूर्ववत होईल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी महाराष्ट्रात यापूर्वी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत, मोठमोठी आंदोलनं देखील झालेली पहायला मिळाली आहेत, मात्र आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेतं?, याकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

“नरेंद्र मोदींचे अश्रू मगरीचे, राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का?”

सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!

पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या