Top News महाराष्ट्र मुंबई

खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय

मुंबई |  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. खासदार अमोल कोल्हेंनी ‘कोरोना’पासून बचावासाठी व्हिडिओ शेअर करत एक खास आणि सोपी उपाययोजना सांगितली आहे.

अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी ‘SUMAN M हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हात धुतले पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट’

हात धुवा, हात धुवा, हात धुवा… असे धुवा-तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या मात्र हात धुण्याचा  कंटाळा करु नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कोरोनापासून वाचण्याचा हा सर्वात साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कोरोनाला घाबरु नका पण जागरुक राहा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

कोरोनाचा परिणाम, परीक्षा न देता विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात!

“भीमा कोरेगावची दंगल सुनियोजित; शरद पवार आयोगासमोर साक्ष देतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या