बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”

नवी दिल्ली | कोरोना (Corona) एकाच नावाभोवती आपलं सर्वांचं आयुष्य गेली दीड वर्ष झालं फिरत आहे. कोरोना महामारीनं सर्वांना मोठा फटका बसला आहे. अशात सध्या कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण (Corona Vaccine) करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोना लसीकरणावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

सध्या संसदेचं अधिवेशन (Session of Parliament) बऱ्याच मुद्द्यावरून गाजत आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर (Vaccination certificate) नरेंद्र मोदींचा फोटो दिसून येतो. लसीकरणाचं श्रेय घेणार असाल तर मग लोकांच्या मृत्यूची जबाबदारी सुद्धा आपण घ्या, अशी टीका कोल्हे यांनी केली आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणादरम्यान युद्धाच्या उदाहरणाची आठवण करून दिली आहे. कोणत्याही युद्धात एक गोष्ट महत्त्वाची असते. समोर येऊन लढायला हवं. आपले सरसेनापती मोदी यांनी आता पुढे येऊन लढायला हवं. कोरोना काळात मृत्यू झालेल्यांची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचं मत यावेळी चर्चेदरम्यान कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, लसीकरणाच्या श्रेयावरून विविध स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. लसीकरण प्रमाणपत्रावरील नरेंद्र मोदी यांच्या फोटोमुळं अनेकदा वाद उद्भवला आहे. अशात आता कोल्हे यांच्या टीकेला भाजपकडून काय उत्तर येतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब”

Omicron Variant चा लहान मुलांना धोका?; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More