Top News पुणे महाराष्ट्र

‘को एक्झिंस्टिंग विथ कोरोना’ ही योजना आखा; खासदार कोल्हेंचा केंद्राला सल्ला

पुणे |  कोरोनाने भारतात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शासनाचा हजारो कोटी रूपयांचा महसूल बुडतो आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिंस्टिंग विथ कोरोना’ ही योजना आखण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रिय पथकासोबत पुणे जिल्यातील आमदार आणि खासदारांचा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद झाला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला हा सल्ला दिला. यावेळी त्यांनी विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले.

आपण जसं टीबी, मलेरियासारख्या आजारांसह आपलं दररोजचं आयुष्य जगत आहोत त्याचप्रमाणे ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ अशी योजना केंद्र सरकारने आखली पाहिजे. लॉकडाउन दीर्घकाळ सुरु ठेवणं आपल्या उद्योग, कामगार आणि नोकरदार वर्गाला परवडणारं नाही. सोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत असल्याचं अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

प्रथमत: आपण ग्रीनमध्ये  ‘को एक्झिंस्टिंग विथ कोरोना’ या योजनची अंमलबजावणी केली पाहिजे. त्यानंतर आपण ऑरेंज आणि रेड झोनमध्ये याची अंमलबजावणी करू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या