गुजरातमध्ये राहणाऱ्या आमच्या भाभीला देखील न्याय द्या!

नवी दिल्ली | तिहेरी तलाक विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर झालं, मात्र त्याला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार विरोध केला. याप्रकरणी बोलताना त्यांनी सभागृहातच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

गुजरातमध्ये राहणाऱ्या आमच्या भाभीसह पतीद्वारे सोडण्यात आलेल्या सर्व धर्मातील 20 लाख महिलांना न्याय द्या, अशी मागणी यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी केली. 

दरम्यान, एमआयएमने या विधेयकाला विरोध करत यामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या, या दुरुस्त्या फेटाळून हे विधेयक मंजूर करण्यात आलं.