बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार असदुद्दीन ओवेसी जेव्हा नियमात सापडतात, इतक्या रुपयांचा दंड झाला

सोलापूर | एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी (Asuddin owaisi) यांना सोलापूरमध्ये चक्क वाहतुक पोलिस कारवाईचा सामना करावा लागला आहे. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी जात असताना त्यांना 200 रुपये दंड भरावा लागला आहे. विना नंबरप्लेटच्या गाडीमधून प्रवास केल्याने असदुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई तर करण्यात आलीच याशिवाय त्यांच्याकडूून 200 रुपये दंड देखील वसूल करण्यात आला.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापूरमध्ये एमआयएमने (MIM) कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ओवेसी उपस्थित राहणार होते. मात्र ते यावेळी त्यांनी हैद्राबादहून सोलापूरला येण्यासाठी विना नंबरप्लेटच्या गाडीचा वापर केला. यावेळी सोलापूरमध्ये आल्यानंतर वाहतुक पोलिसाने त्यांच्यावर कारवाई केली.

ओवेसींनी या विना नंबरप्लेटच्या गाडीने हैद्राबाद नाका ते सोलापुर शासकिय विश्रामगृह (Hyderabad to Solapur government rest house) असा प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी त्यांच्याकडे लँडरोव्हर गाडी होती. शिवाय कारवाईनंतर त्यांच्या गाडीला टीएस 11 ईव्ही 9922 या नंबरची नंबरप्लेट देखील लावण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या ओवेसींना एक वेगळाच अनुभव मिळाला आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या ( Solapur Police) निर्भीड कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. या पोलिस अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक स्वत: सोलापुर आयुक्तांनीही केलं आहे. यावेळी सोलापूर आयुक्तांनी चक्क या पोलिस अधिकाऱ्याला 5 हजार रुपये बक्षिस देऊन त्याच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. सामान्य नागरिक असो किंवा आमदार, खासदार प्रत्येकजण कायद्यासमोर सारखेच, असं या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या वागण्यातून दाखवून दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा आजचे ताजे दर

पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार?, टास्क फोर्सने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

आता विद्यार्थ्यांना महानगरपालिका देणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! ‘या’ आमदारानी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More