Bajrang Sonawane | बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी वकील शशिकांत शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असून त्यावर सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे होते. पण निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ वाढवण्यात आले. या गलथान कारभारामुळे 4,261 मतदार मतदानापासून वंचित राहिले. या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे. त्यामुळे ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली.
बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केलं आहे.
शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहे, पण त्यांनी या पदाचा शपथपत्रात उल्लेख केला नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!
PF चे पैसे काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा!
निक्कीच्या आईने अरबाजबद्दलची ‘ती’ गोष्ट सांगताच निक्कीला बसला मोठा धक्का!
पुण्यात बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ!