नवी दिल्ली | आगामी निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात भाजपला 40, काँग्रेसला 42 तर इतरांना 18 टक्के मतं मिळतील. याच मतांच्या टक्केवारीनूसार विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 117, भाजप 106 तर इतर पक्षांना 7 जागा मिळतील.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेचा कल जरी भाजपच्या बाजूने असला तरी लोकसभेला मात्र येथील मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. लोकसभेत भाजपला 46 टक्के, काँग्रेसला 39 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळतील. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना 54 टक्के तर राहुल गांधींना 25 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती?
-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…
-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!
-भाजपला मोठा धक्का; मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होणार!