Top News

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

नवी दिल्ली | राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी मागासवर्गियांना आरक्षण दिले होते. या घटनेला 116 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसद परिसरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी सगळे खासदार एकत्र आले होते.

मराठा समाजाने आतापर्यत शांततेने मोर्चे काढले होते. त्याचा आदर्श सगळ्या जगाने घेतला होता. त्यामुळे मराठा समाजाने आरक्षणासाठी लोकशाहीच्या मार्गाने शांततेत मोर्चा काढण्याचे आवाहन खासदारांनी केलं.

दरम्यान, राज्यसभेत मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार धनंजय महाडीक यांनी आवाज उठवला होता. आणि यापुढेही मराठा आरक्षणासाठी चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या