मुंबई | मुंबईच्या हॉटेलमध्ये दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून फास लागल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्याने पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.
डेलकर मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातल्या आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले होते. त्यांच्याजवळ मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
ही सुसाइड नोट गुजरातीत लिहिलेली आहे आणि तब्बल 15 पानांची ही चिठ्ठी आहे. या चिठ्ठीत अनेक मोठ्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती आहे.
खासदार मोहन डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून दादरा नगरहवेली मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेलेले होते. ते या भागातून 7 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
थोडक्यात बातम्या-
संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत, पाहा व्हिडिओ
‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका
“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”