बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदारांना संसदेच्या कँटीनमधल्या खाद्यपदार्थांवर मिळणारी सवलत बंद

नवी दिल्ली | लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवरची सबसिडी खासदारांनी सोडावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्याला सर्व खासदारांनी एकमताने संमती दिली आहे. त्यामुळे शाकदारांना मिळणारी सवलत आता बंद होणार आहे.

संसदेच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर संसदेच्या संदस्यासोबतच अधिकाऱ्यांनाही सवलत दिली जायची. या सबसिडीवर सरकारचा 17 कोटींचा खर्च व्हायचा. हा खर्च आता वाचणार आहे.

कँटीनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरांवरून वाद व्हायचे. ही बाब लक्षात घेत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खाद्य समितीला या विषयात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते.

खासदारांना इतक्या सोयी-सुविधा मिळतात. मग तरी त्यांना संसदेच्या कँटीनमध्ये ही सवलत का?, असा प्रश्न वारंवार चर्चेला जायचा. ओम बिर्ला यांच्या आवाहनाला खासदारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ही सबसिडी आता बंद होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More