बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही!’ तरूणीच्या अजब तक्रारीनंतर पोलिसांनी केलं असं काही की…

भोपाळ | नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याच्या घटना काही वेळेस घडतात. पण प्रियकर आणि प्रेयसीच्या भांडणाची अजब घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घडली आहे. प्रियकर रूसून बसला म्हणून व्याकुळ झालेल्या तरूणीने थेट पोलिसांनाच फोन केला. माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही, अशी तक्रारच त्या तरूणीने पोलिसांकडे केली आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील तरूणी आणि सरानी येथील मुलगा यांचे प्रेमसंबंध होते. तर काही दिवसांपूर्वी त्या तरूणाचा वाढदिवस झाला पण काही कारणास्तव त्याची प्रेयसी त्याला शुभेच्छा देऊ शकली नाही. यावरून वादाची ठिणगी पडली आणि तरूणाने त्याच्या प्रेयसीशी बोलणं बंद केलं. चिडलेल्या प्रियकराशी बोलण्याचे अनेक प्रयत्न त्या तरूणीने केले पण तो काही बोलायला तयार नव्हता.

प्रियकराच्या न बोलण्याने केवीलवाण्या झालेल्या तरूणीने थेट पोलिसांनाच फोन केला आणि माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नसल्याची तक्रार केली. तरूणीच्या अजब तक्रारीने पोलिसही बुचकळ्यात पडले पण त्यांनी तरूणीची तक्रार गांभीर्याने घेतली आणि तिच्या प्रियकराला फोन करून पोलिस ठाण्यात बोलावून घेतलं. त्यानंतर त्या दोघांनाही समोर बसवून पोलिसांनी समुपदेशन केलं आणि लग्न करण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर या दोघांत समेट घडवून आणली. पोलिसांनी या जोडप्याला लग्न करण्याचा सल्ला दिला आणि इतकंच नाही तर पोलिसांनी दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी तयार केलं. दोघांच्या घरच्यांनीही या लग्नाला होकार दिला आणि हे जोडपं आर्य समाज मंदिरात लग्नाच्या बेडीत अडकले असल्याची माहिती सीएसपी मोतीलाल कुशवाह यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

Netflix वापरताना मोबाईल डेटा संपतोय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईल डेटा वाचवा

“आता निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कृषी कायदे मागे घेतले”

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट, पण धोका अदयाप टळलेला नाही

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More