औरंगाबाद | शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले होते. त्यानंतर कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.
बुधवारी इम्तियाज जलील यांच्यासह 24 दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवाजवी दंड ठोठावल्या प्रकरणी इम्तियाज जलील हे कामगार कार्यालयात गेले होते. मोठ्या व्यापाऱ्यांसह छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी कामगार कार्यालयात आपला मोर्चा वळवला.
कामगार कार्यालयात पोहचल्यावर दुकानाचे सील काढून, दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जलील यांनी कार्यालयात केली. मात्र त्यांना तिथे उलट सुलट उत्तरे देण्यात आली. मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी यांच्या हाताला धक्का लागून मोबाईल खाली पाडला, त्यामुळे जलील यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना कमी झाल्यानं आता औरंगाबादेत आजपासून दुकानं उघडण्यात आली आहेत. शहरात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर रमजानच्या शेवटच्या आठवड्यात सर्व दुकानं उघडी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती.
थोडक्यात बातम्या-
नागपूरात काळ्या बुरशीचं थैमान सुरूच; मृत्युच्या आकड्याचं शतक
मोठी बातमी! मुंबईत कोरोनावर उपयुक्त औषधांचा कोट्यवधींचा बनावट साठा जप्त
लेकरांना बंधाऱ्यात फेकून आई फरार, धक्कादायक कारण आलं समोर
आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत
“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर
Comments are closed.