Top News महाराष्ट्र मुंबई

‘तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकेल ; भाजप खासदाराला विश्वास

मुंबई | फेब्रुवारी महिन्यात राज्यातील 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीचं वारं आता वाहायला सुरूवात झाली आहे. अशातच भाजप खासदार कपील पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच सरकार येणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत तीन काय तीस पक्ष असले तरी भाजपच जिंकेल, असा विश्वास कपील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कपील पाटलांनी यावेळी बोलताना औरंगाबादच्या नामंतरावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. कपील पाटील म्हणाले, राज्यात सध्या खिचडी सरकार आहे त्यामुळे औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं जाईल असं मला वाटत नाही. यावेळी त्यांनी मनसे-भाजप युती यावरही आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मनसेने उत्तर भारतीयांचा मुद्दा सोडला तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकत असल्याचं कपील पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘महिलांना फक्त सन्मान आणि प्रेमाची गरज तुमच्या पगाराची नाही’; कंगणाचा शशी थरूर यांच्यावर निशाण

धक्कादायक! शीर कापलेल्या नग्न अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह

‘शिवसेना नव्हे ही तर औरंगजेब सेना’; भाजपचा सेनेवर निशाणा

हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची 30 वर्षांची परंपरा खंडित

ड्रग प्रकरणी एनसीबीने ‘या’ अभिनेत्रीला केली अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या