बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘रात्री अपरात्री लोकांचे फोन यायचे…’; खासदार मनोज झा यांचं मन सुन्न करणारं भाषण

नवी दिल्ली | सध्या दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. 25 दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. या अधिवेशनात अनेकांची भाषणे झाली. काही खासदारांची भाषणे खास असतात. सध्या असचं एक भाषण सध्या तुफान चर्चेत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या भाषणाची चर्चा सुरू आहे. हे भाषण आहे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांचं.

दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजन अभावी रूग्ण दगावले नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं. एका लेखी उत्तरात केंद्राने ही माहिती दिली होती. त्यावर आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरून मनोज झा यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. मी त्या लोकांना माझा माफीनामा देतो, ज्यांच्या मृत्युलाही आम्ही मान्यता देत नाही. एक सामूहिक माफीनामा या सभागृहानं त्या जीवांना पाठवावा ज्यांची प्रेतं गंगेच्या पाण्यावर तरंगत होती, असं मनोज झा म्हणाले.

मी काल सेक्रेटरी जनरलशी बोललो. त्यांनी सांगितलं की, कुठल्याच दोन अधिवेशनाच्या दरम्यान 50 खासदारांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच आली नाही. राजीव सातव यांचं वय काय होतं या जगातून जाण्याचं? रघूनाथ महापात्रा जेव्हा भेटायचे गळ्यात पडायचे. मी आकडा सांगत नाही , तुम्ही तुमच्या दुखःचा आकडा शोधा, असं भावनिक भाषण त्यांनी राज्यसभेत केलं आहे.

दरम्यान, रात्री अपरात्री लोकांचे फोन यायचे, त्यांना वाटायचं खासदार आहे काही मदत मिळेल. पण केवळ फक्त 2 ते 3 टक्के लोकांना मदत करू शकलो. आम्हाला सरकारचा कोणताच आकडा नकोय, जे जिवंत असताना पुरावे सोडून गेलेत. हे फक्त सरकारचं नाही तर सामुदायिक अपयश आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रदोह झाला असता- यशोमती ठाकूर

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More