खासदार पटोले व रविकांत तुपकरांची गुप्तचर्चा, आंदोलनाची शक्यता!

अकोला | विदर्भात लवकरच राजकारणाची नवी समीकरणं उमटण्याची शक्यता आहे. स्वपक्षाविरुद्धच बंड पुकारणारे भाजपचे खासदार नाना पटाेले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांची गुप्त चर्चा झाली

सोयाबीन, कापूस व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भात लवकरच मोठे आंदोलनाची चर्चा या दोघांमध्ये झाल्याचं असल्याचं समजतेय.

दरम्यान, केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकरी विराेधी धाेरणं राबवतात, असं म्हणत पटाेले यांनी स्वपक्षाविरुद्धच बंड पुकारलेय.