बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार नारायण राणेंना दिल्लीतून तातडीने बोलावणं; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राणेंना स्थान?

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या तयारीत सरकार असल्याचं गेल्या काही दिवसात ऐकायला मिळत होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील बड्या नेत्याची यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागेल अशा चर्चा गेल्या काही दिवसात सुरू होत्या. त्यातच काल रात्री नारायण राणे यांना  भाजप राष्ट्रीय कार्यालयातून फोन आला असल्याची माहिती समोर आली. तसेच तातडीने त्यांना दिल्ली येथे बोलावलं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी आज नारायण राणे यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार राणे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होणार का? अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे यांना भाजपकडून कॅबिनेट मंत्रिपद देऊन त्यांची ताकद वाढवून भाजप शिवसेनेवर या निवडणुकीत कुरघोडी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.  भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यालयातून थेट फोन आल्याने राणे यांचा समावेश मंत्रिमंडळात करून कोकणात भाजपचा विस्तार करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

 

थोडक्यात बातम्या  –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More