बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”आज देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल लागला”

अमरावती | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार आणि भाजपला संमिश्र प्रमाणात जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची चौकशी करतात. त्यांना समजून घेतात. त्यामुळे जनतेने भाजपला साथ दिली आहे. तर शिवसेनेला जनतेनं नाकारलं आहे. त्यामुळे जनता कुणासोबत आहे. ते या निवडणुकीवरून सिद्ध झालं आहे. हा तर फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा निकाल आज लागला आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

या निवडणुकीच्या प्रचाराला आम्ही कोणीही गेलो नाही. तरी देखील जनतेने आम्हालाच निवडून दिलं आहे.  भाजप आणि अपक्षांना प्रत्येकी 25 टक्के जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला 50 टक्के जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालात आम्हीच सरस आहोत. तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, राज्यात 5 ऑक्टोेंबर रोजी 6 जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान झालं होतं. त्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. त्यानंतर आता राज्यात विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे.

थोडक्यात बातम्या-

येत्या 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’; ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून बंदची हाक

यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ दोन संशोधकांना जाहीर!

भाजपला शह देण्याची तयारी, पवारांच्या तीन पिढ्या मैदानात!

“कर्ज मिळवताना 7 पिढ्या जातात, तुम्हाला 7 तासात 85 कोटींचं कर्ज मिळालंच कसं?”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! अखेर ‘या’ बहुचर्चित पंचायत समितीवर भाजपचा कब्जा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More