बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारला”

मुंबई | प्रवेशपत्रामध्ये चुका झाल्याने आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर आता राज्याचं राजकारण पेटलेलं दिसत आहे. या प्रकरणावरून भाजप सात्त्याने ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्यातच आता खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्य सरकारने आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली होती. त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फाॅर्म भरले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र आले, सेंटर ठरली. त्यात अनेकांचे सेंटर हे घरापासून लांब लाब आली होती. त्यामुळे अनेकांनी परीक्षेसाठी राहण्यासाठी खाण्यासाठी खर्च केला. मात्र महाराष्ट्रता चालणारं तीन तिघाडी काम बिघाडी सरकारने त्यांनी ऐनवेळी परीक्षा रद्द केली, असं नवनीत राणा म्हणाल्या.

ठाकरे सरकारने परीक्षेच्या एक दिवस आधी रात्री 10 वाजता सांगितलं की परीक्षा होणार नाही. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला, आरोग्य विभागाला लाज वाटली पाहिजे. उद्धव ठाकरे यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका देखील नवणीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन कारण विचारलं पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे आर्थिक नुकसान झालं आहे. त्याचा मोबदला सरकारने दिला पाहिजे अशी मागणी देखील नवणीत राणा यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

“मोदीजी अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा”

“सोनू सूद जिवंत असो वा नसो, लोकांना मोफत उपचार मिळालाच पाहिजे”

मी जेलमध्ये असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला – छगन भुजबळ

काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, ‘पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More