बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या शिवारात केली पेरणी, पाहा व्हीडिओ

अमरावती |   यंदा मान्सूनचं आगमन अगदी वेळेत झाल्याने शेतकरी सुखावला आहे. बळीराजाची पेरणीच्या कामाची सध्या लगबग सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पेरणीचा अनुभव घेतला.

दौऱ्यावर असताना त्यांना एका शेतात पेरणी सुरू असल्याचं दिसलं. त्यांनी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितली अन् थेट त्या शेतकऱ्याच्या वावरात पोहचल्या. शेतकऱ्याकडून त्यांनी पेरणीविषयक माहिती घेतली. तसंच पेरणीचा अनुभव देखील घेतला.

सध्या देश एका कठीण संकटातून जात आहे. अशा वेळी बळीराजाने कुणलाही उपाशी न राहू देण्यासाठी कंबर कसली आहे. याच बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रति चार शब्द आपुलकीचे बोलण्यासाठी मी शेतात आल्याचं राणा यांनी सांगितलं.

यावेळी शेतात असलेल्या शेतकरी, शेतमजुराशी नवनीत राणा यांनी आपुलकीने संवाद साधला. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. तुमच्या प्रश्नांसाठी मी नक्की काम करेन, असा शब्द देऊन त्या पुढील दौऱ्यासाठी रवाना झाल्या.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या कुटुंबावर पुन्हा दुखा:चा डोंगर, परिवारातील ‘या’ व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

सरकारनं सांगितलं कोरोनाची ‘ही’ दोन लक्षणं दिसली; तर टेस्ट करुनच घ्या!

राज्यात आज 2786 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More