बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणारच…”, नवनीत राणा कडाडल्या

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दोन सभा घेत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे. राज ठाकरेंनंतर आता भाजप देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेतील वाद सातत्यानं वाढला आहे.

राणा यांनी आताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा उल्लेख करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा शिवसेनेला विसर पडला आहे, असं राणा म्हणाल्या आहेत. परिणामी राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून राणा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

मी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणारच आणि मला कोणी रोखू शकत नाही, असं आव्हान नवनीत राणा यांनी शिवसेनेला दिलं आहे. गेल्या काही दिवसांत शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सुन आहे, माझ्याकडं दुहेरी ताकत आहे, असं राणा म्हणाल्या आहेत.

दरम्यान, अमरावतीतील राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्यानंतर वाद वाढला आहे. नवनीत राणा आणि रवि राणा हे 23 तारखेला मुंबईत हनुमान चालीसा म्हणण्यासाठी येणार आहेत. परिणामी मुंबई पोलिसांनी राणांना नोटीस देखील बजावली आहे.

थोडक्यात बातम्या – 

शेतकऱ्यांनो… कामं उरकून घ्या! मराठवाड्यासह राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”

धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून जोर का झटका

“ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच ते…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More