Top News अमरावती महाराष्ट्र

पहिल्यांदा घरातील 7 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता खा. नवनीत राणा यांनाही कोरोनाची लागण

अमरावती |  खासदार नवनीत राणा यांच्या घरात कोरोनाने याआधीच शिरकाव केला होता. नवनीत राणा यांच्या सासु-सासऱ्यांनासह घरातील अन्य 7 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता नवनीत राणा यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (MP Navneet Rana Tested Corona Positive) त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. माझ्या संपर्कातील व्यक्तींनी आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या जोरावर मी लवकरच कोरोनावर मात करेन, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. (MP Navneet Rana Tested Corona Positive)

माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले. एक आई म्हणून त्यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते. मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता-घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. (MP Navneet Rana Tested Corona Positive) माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

कामाशिवाय घरा बाहेर पडन नका असं सांगताना शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत आम्ही सगळे कुटुंबीय लवकात लवकर कोरोनावर मात करू आणि आपल्या सेवेत दाखल होऊ असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. (MP Navneet Rana Tested Corona Positive)

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

मंदिरे बंद ठेऊन राज्य सरकारनं आडमुठेपणा केला आहे- गिरीश महाजन

“विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक, शिवभक्तांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार”

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या