मुंबई | नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. त्यामुळे हल्ली तो सगळीकडे आनंदाने साजरा केला जात आहे. यामध्ये राजकारणी लोकदेखील संक्रातीचा आनंद घेताना दिसत आहे. खासदार नवनीत राणा यांनी संक्रात सणाच्या निमित्ताने (MP Navneet Rana) उखाणा घेतला आहे.
अमरावतीत ( Amravati) राणा दाम्पत्यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी पतंग उडवण्याचा आनंद राणा दाम्पत्याने घेतला. संक्रांतीच्या सण असल्याने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवादरम्यान नवनीत राणांनी हटके उखाणा घेतला आहे. ”दही साखर तूप, रवी मला आवडतात खूप” असा उखाणा नवनीत राणांनी घेतला. तसेच या प्रेमाच्या गोष्टी आहेत. असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, नवनीत राणा विरुद्ध शिवसेना(Shiv Sena) हा वाद काही नवा नाही. संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून नवनीत राणांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. आम्ही नेहमीच लहान मुलांच्या आनंदात आनंद साजरा करतो.
त्याप्रमाणे मी संजय राऊत(Sanjay Raut), सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील तिळगूळ देते. जे उठल्यावर फक्त तिखट बोलतात. त्यांनी आता गोड बोलायला सुरुवात करावी. त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. असा टोला यावेळी राणांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होम मिनिस्टर’ पोहचले राणादा आणि पाठकबाईंच्या घरी
- मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
- “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’; चित्रा वाघ पुन्हा भडकल्या
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
- आलिया-रणबीरच्या लेकीचे फोटो आले समोर!