बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार नुसरत जहाॅंनं बेबी बम्पसोबत शेअर केले खास फोटो

मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आहेत. पती निखिल जैनपासून त्या विभक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. अशातच आता नुसरतनं बेबी बम्प फ्लॉन्ट करत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा आणि क्यूट लुक पाहून चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

आठवड्याच्या शेवटी नुसरतनं एकापेक्षा जास्त फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नुसरतची वेगळी स्टाईल पाहायला मिळत आहे. नुसरतची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नुसरतचा हा अंदाज काही चाहत्यांना पसंत पडला असला तरीही काही युझर्स मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नुसरतच्या प्रेग्नन्सीबद्दल बातमी समोर आल्यानंतर निखिल जैन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, आम्ही 6 महिन्यांपासून वेगळे राहतोय. आमचं लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. निखिलनं असंही सांगितलं की, त्यांचा बराच वेळ नुसरतशी संपर्क नव्हता.

दरम्यान, नुसरत ही बंगालची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने असुर, एसओएस कोलकाता, क्रिसक्रॉस, बोलो दुग्गा मॅकी, हरिपदा बंडवाला आदी अनेक बंगाली चित्रपट केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

थोडक्यात बातम्या – 

“गोपीचंद पडळकर बांडगुळ आहे आणि अशी बांडगुळं वाढत आहेत”

पालकांसाठी खुशखबर! लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ‘या’ लसीच्या चाचणीला लवकरच होणार सुरुवात

डेल्टा प्लस विषाणुची फुफ्फुसावर संसर्ग होण्याची शक्यता जास्त – डॉ. एन. के. अरोरा

आजही सोन्याच्या दरात वाढ तर चांदीचे दर स्थिर; वाचा ताजे दर

…..म्हणून लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन नवरोबा झाडावर जाऊन बसला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More