‘आघाडी धर्म पाळला जाणार नसेल तर…’; शिवसेना नेत्याचा गंभीर इशारा
बीड | महाविकास आघाडीला सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या आघाड्यांविरोधात लढावं लागत आहे. भाजपचा विरोध आणि आपापसातील भांडणांमुळं महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. आता बीडमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना खासदारांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी बीडमध्ये आघाडी धर्माचं पालन करत नसल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर बीडमध्ये जर आघाडी धर्म पाळला नाही तर उस्मानाबादमध्ये देखील आम्ही सहकार्य करणार नसल्याचं, ओमराजे म्हणाले आहेत.
उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री आहेत परिणामी आम्ही त्याठिकाणी आघाडी धर्म पाळत आहोत. शिवसैनिकांना त्रास देऊ नये अन्यथा योग्य वेळेला उत्तर देऊ, असा इशारा ओमराजेंनी राष्ट्रवादीला दिला आहे.
दरम्यान, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पारंपारिक राजकीय लढाई चालत आली आहे. सध्या ओमराजेंच्या बीडमधील भाषणानं राष्ट्रवादीला चांगलाच हादरा बसला आहे.
थोडक्यात बातम्या –
“मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन”
“होय, आम्ही नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते दररोज आमच्यावर मिसाईल्स सोडतायेत”
तरूणांसाठी गुड न्यूज; परिक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी
रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा!
Comments are closed.