बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

बंगळूरू | मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांनी एकगठ्ठा राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अडचणीत आलं आहे. आज या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे.

बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

मध्य प्रदेशातील 21 बंडखोर काँग्रेस आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह या हॉटेलवर पोहोचले. मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करण्यास परवानगी दिली नाही.

दरम्यान, आमदारांना भेटण्यास परवानगी न दिल्याने दिग्विजय सिंह यांनी हॉटेलबाहेरच ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतलं.

 

ट्रेंडिंग बातम्या-

गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा

काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका

महत्वाच्या बातम्या-

रस्त्यावर थुंकल्यास आता भरावा लागणार तब्बल इतका दंड!

कोरोनाचा धोका ऑगस्ट महिन्यापर्यंत; डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज

पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More