विदेश

संसदेत चर्चेदरम्यान ‘या’ खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज; पाहा व्हीडिओ

इटली | इटलीतील संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान एका खासदारानं आपल्या मैत्रीणीला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. या घटनेनंतर याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्याकडे लग्नाची मागणी घातली.

आज माझ्यासाठी खास दिवस आहे, असं म्हणत त्यांनी टेबलाखालून अंगठी काढून माईकमधुन  आपली सभागृहातील गर्लफ्रेंड एलिसा हिला ‘माझ्याशी लग्न करशील का’? असं विचारत सर्वांसमक्ष प्रपोज केलं.

अनपेक्षितरित्या घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहातील सर्वंच खासदार आश्चर्यचकीत झाले, मात्र झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला सर्वं खासदारांनी टेबल वाजवत त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केलं.

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या