बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तो दिवस मी विसरू शकत नाही, मी शाळेत होतो तेव्हा…”, भर कार्यक्रमात राहुल गांधी भावूक

डेहराडून | बांग्लादेश मुक्ती संग्रामचा लढा सुरू असताना भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक दुश्मन देशांमध्ये युद्ध पेटलं. केवळ 13 दिवस चालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तान सैन्याची धुव्वा उडवला. तो भारतीय इतिहासातील सुर्वणक्षण होता. आज देशभर या 1971 च्या विजयाचा उत्सव साजरा केला जातोय. अशातच काँग्रेस खासदार राहुल गांधी एका कार्यक्रमात बोलताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

दिल्लीत अशाच एका कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. त्यावरून एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा आहे. तसेच इंदिरा गांधी यांच्या निधनाच्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्यावेळी राहुल गांधी भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे.

मी तो दिवस कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा मला शाळेत सांगितलं गेलं की इंदिरा गांधींना 32 गोळ्या लागल्या आहेत. त्यावेळी उत्तराखंडमध्ये हजारो कुटुंब आहेत, ज्यांच्या घरी फोन आला. बाबा शहिद झाले, काका शहिद झाले. मी हे खुलेपणाने बोलू शकतो. कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये एक नातं आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, ज्या महिलेनं देशासाठी 32 गोळ्या अंगावर झेलल्या, तिचं नाव कार्यक्रम पत्रिकेवर नव्हतं. कारण या सरकारला सत्याची भीती वाटते, असा टोला देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्षे होणार’, केंद्र सरकारच्या हालचालींना वेग

Mr.360 वादाच्या भोवऱ्यात! ‘या’ प्रकरणात आढळला दोषी, कारवाईची शक्यता

मुहूर्त ठरला! 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, यंदा ऑफलाईन परीक्षा

ओमिक्राॅनबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा; ‘या’ महिन्यात रूग्ण झपाट्याने वाढणार

ठोंबरेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार म्हणतात, ‘रुपालीताई डॅशिंग नेत्या, मात्र…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More