Ravindra Waikar l राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर देखील करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केला; पोलिसांचं स्पष्टीकरण
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केली होती.
तसेच रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, प्रिथपाल बिंद्रा, राज लालचंदानी, आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात देखील फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ravindra Waikar l भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता आरोप :
यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड रवींद्र वायकर यांनी लाटला होता. तसेच त्या जागी पंचतारांकीत हॉटेल बांधण्याचा घाट घालून तब्बल 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
या गैरव्यवहारातून मुंबई महापालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत महापालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता याप्रकरणी नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाला आहे.
News Title – Mp Ravindra Waikar Get Clean Chit
महत्वाच्या बातम्या-
T20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार, जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती
या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता
परीक्षा न देता थेट बँकेत मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी अर्ज झाले सुरू
‘एवढं लक्षात ठेवा’ अजित पवारांची भरसभेत कविता; जयंत पाटलांना हसू अनावर
“अदानींची गाडी चालवणारा ड्राईव्हर…”; रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला नितेश राणेंच प्रत्युत्तर