नवी दिल्ली : आगामी निवडणुका जिंकण्याचा मनसुबा असलेल्या भाजपला धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपचा पराभव होईल, अशी शक्यता ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाची आकडेवारी भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जातेय.
मतदानपूर्व चाचण्यांचा हा कल निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास भाजपचे विजयाचे गणित पुरते फसू शकते. भाजपसाठी सुदैवाची बाब म्हणजे तिन्ही राज्यांतील नागरिकांनी पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती नरेंद्र मोदींनाच दिली आहे.
कोणत्या राज्यात काय स्थिती?
-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…
-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!
-छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!
Comments are closed.