मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला बदमाशाला शिवप्रेमींना चांगलाच चोप दिला आहे. शिवप्रेमींच्या कृत्याबद्दल आता त्यांचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीही शिवप्रेमींचं अभिनंदन करत माझा तुम्हाला फुल्ल सपोर्ट आहे, असं म्हटलं आहे.
विमानातून बाहेर आलो आणि मोबाईलमध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्यासुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
मी कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, असं म्हणत ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.
दरम्यान, चोप दिलेल्या इसमाचं नाव जितेंद्र राऊत असं आहे. तो सातत्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करत असतो. या प्रकारामुळेच शिवप्रेमींना त्याला मजबूत चोप दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती
जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांची चिंता मिटली; हॉटेलचं जेवण मिळणार घरपोच
पुण्यात एकाला कोरोनाची लक्षणं न दिसताही रिपोर्ट आला पॉझिटिव्ह!
जातिवादाचा कोरोना कधी नष्ट होणार?; रामदास आठवलेंचा सवाल
Comments are closed.