बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर नवा पक्षही स्थापन करू’; खासदार संभाजीराजे भोसलेंचंं मोठं वक्तव्य

मुंबई | खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यभर दौरा करत सर्व नेत्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबतची रोखठोक भूमिका व्यक्त केली. त्याचबरोबर नव्या राजकीय पक्षाचं सूतोवाचही केलं. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू, असं मोठं वक्तव्य केलं संभाजीराजे भासलेंनी केलं आहे.

6 जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यामुळे आज मी घोषणा करतोय येत्या 6 जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे. 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे.

बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू. पण आता तो विषय नाही. सध्या मराठा आरक्षणाचा तिढा सुटणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं संभाजीराजे म्हणाले. शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहेत. त्यामुळे पत्रकारांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार आहे का? असा सवाल संभाजीराजेंना केला. यावर शिवशक्ती-भीमशक्ती ही पूर्वीपासूनच एकत्र आहे. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यामुळे या दोन्ही शक्ती एकत्रच होत्या आणि आहेत, असं उत्तर संभाजीराजेंनी दिलं.

दरम्यान, मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या गोष्टी तुम्ही मार्गी लावा. नाहीतर मी कोविड वगैरे काहीही बघणार नाही. हा संभाजीराजे आघाडीवर असणार तिथे. समाजाला आम्हाला वेठीला धरायचं नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचं नाहीये. 6 तारखेला लोकांना नाही तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आनंदाची बातमी! मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या हजारांच्या आत; कोरोनामुक्तीचा दर 94 टक्यांवर

काय सांगता! प्रियंकाच्या या संपुर्ण अवताराची रक्कम ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More